ASMITA HYPNOTHERAPY AND COUNSELLING CENTER

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि उपाय

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि उपाय

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि उपाय

विद्यार्थ्यांच्या वयात मानसिक, शैक्षणिक आणि भावनिक बदल जास्त प्रमाणात घडतात. या बदलांमुळे अनेकदा त्यांना अभ्यासात अडचणी, एकाग्रतेचा अभाव, वाईट सवयी आणि आत्मविश्वासात घट जाणवत असते. पालकांना किंवा शिक्षकांना हे प्रश्न लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते, आणि त्यामुळे विद्यार्थ्याचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे बनते.

अस्मिता हिप्नोथेरपी अँड कौन्सिलिंग सेंटर मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यानुसार योग्य थेरपी आणि समुपदेशनाचे सत्र घेतो. संमोहन (Hypnotherapy), EFT (Emotional Freedom Technique), Relaxation Techniques, आणि Positive Reinforcement चा वापर करून विद्यार्थ्यांच्या मनातील नकारात्मक विचार, भीती, न्यूनगंड यावर काम केले जाते.

या थेरपीमध्ये कोणतीही गोळी किंवा औषध वापरले जात नाही. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्याच्या भावनिक व मानसिक स्थितीचा सखोल अभ्यास केला जातो आणि त्यानुसार वैयक्तिक ट्रीटमेंट प्लॅन तयार केला जातो. हे सत्र पालकांच्या समुपदेशनासह घेतले जातात जेणेकरून घरचे वातावरणसुद्धा सुधारेल.

१. सततचा मोबाईल आणि सोशल मिडियाचा वापर
२. अभ्यासासाठी प्रेरणा न मिळणे
३. पालकांचे किंवा शिक्षकांचे जास्त अपेक्षा
४. भावनिक असुरक्षितता किंवा प्रेमभंगाचा मानसिक आघात
५. योग्य झोपेचा अभाव
६. चुकीची संगत किंवा एकाकीपणा
७. शरीरातील हार्मोनल बदल (विशेषतः वयात येताना)
८. पूर्वीच्या अपयशाचा किंवा नकारात्मक अनुभवाचा प्रभाव
९. पालकांशी संवादाचा अभाव
१०. आत्मविश्वासाचा अभाव आणि सततची तुलना इतरांशी
११. टी.व्ही., गेम्स, मोबाईल मुळे मिळणारी तात्पुरती सुखद भावना
१२. अभ्यासाची चुकीची पद्धत किंवा वेळेचे गैरव्यवस्थापन
Get A Free Consultation