
गृहिणींच्या समस्या आणि उपाय
घराची जबाबदारी, कुटुंबातील अपेक्षा, सततचे काम आणि त्यात कौतुकाचा अभाव – या सर्वांचा परिणाम गृहिणींच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो. अनेकदा ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना चिडचिड, असहायता, भीती, न्यूनगंड आणि तणाव जाणवू लागतो. काही महिलांमध्ये या मानसिक तणावामुळे मासिक पाळीतील गडबड, मूड स्विंग्स, वाद, संशय, द्वेष भावना निर्माण होतात.
अस्मिता हिप्नोथेरपी अँड कौन्सिलिंग सेंटर मध्ये आम्ही गृहिणींच्या भावनिक गुंतागुंतींना समजून घेतो आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करून त्यांना तणावमुक्त आणि संतुलित जीवन जगण्यास मदत करतो.
आमच्या सेशन्समध्ये हिप्नोथेरपी, समुपदेशन, EFT (Emotional Freedom Technique), Relaxation व Healing तंत्रांचा वापर केला जातो. हे सर्व उपचार पूर्णपणे औषधमुक्त असून, गृहिणींना आत्मविश्वास, संयम आणि आनंद मिळवण्यासाठी मदत करतात.
या सेवा महिलांच्या गरजेनुसार सुसंगत व गोपनीय पद्धतीने दिल्या जातात.
समस्यांची संभाव्य कारणे
१. सततचे घरकाम आणि विश्रांतीचा अभाव
२. पती किंवा घरातील सदस्यांकडून अपेक्षित कौतुक व पाठिंब्याचा अभाव
३. संवादाचा अभाव व एकटेपणा
४. जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी वेळ मिळत नसणे
५. आर्थिक किंवा कौटुंबिक असुरक्षितता
६. शरीरातील हार्मोनल बदल (विशेषतः पाळीच्या वेळी)
७. विवाहानंतर आलेले आयुष्यातले अचानक बदल
८. भूतकाळातील नकारात्मक अनुभव किंवा भावनिक जखमा
९. सततची तुलना इतर स्त्रियांसोबत
१०. आत्मविश्वासाचा अभाव आणि स्वतःकडे दुर्लक्ष
११. पतीवर किंवा कुटुंबीयांवरचा संशय आणि असुरक्षितता
१२. टी.व्ही. किंवा सोशल मीडियामुळे मिळणारी चुकीची कल्पना व अपेक्षा