ASMITA HYPNOTHERAPY AND COUNSELLING CENTER

व्यसने समस्या आणि उपाय

व्यसने समस्या आणि उपाय

व्यसने समस्या आणि उपाय

व्यसन ही एक मानसिक, भावनिक आणि अनेकदा सामाजिक समस्याही असते. व्यसन कोणतेही असो – दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मटका, लॉटरी, चारित्र्यावर संशय, वेश्यागमन – या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब, नातेसंबंध, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर परिणाम होतो.

आमच्या सेंटरमध्ये क्लायंटशी सखोल संवाद साधून त्यांच्या व्यसनाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. समोहन चिकित्सा (Hypnotherapy) द्वारे त्यांच्या मनातील नकळत कारणांवर काम केलं जातं. त्यासोबतच व्यसनमुक्ती प्रक्रियेसाठी आवश्यक त्या समुपदेशन सत्रांद्वारे मानसिक ताकद वाढवली जाते. काही गंभीर व्यसनप्रवृत्तींसाठी समोहन उपचारासोबत वैद्यकीय किंवा नातेवाईकांच्या सहकार्याचीही गरज भासते – ही बाब आम्ही प्रामाणिकपणे क्लायंटला समजावतो.


व्यसन निर्माण होण्याची प्रमुख  कारणे:

  1. मानसिक ताणतणाव आणि चिंता

  2. एकटेपणा किंवा नैराश्य

  3. मैत्री किंवा सामाजिक प्रभाव (Peer Pressure)

  4. कौटुंबिक कलह किंवा बालपणीचा मानसिक आघात

  5. आत्मविश्वासाचा अभाव

  6. मनोरंजन म्हणून सुरुवात झालेली सवय

  7. नातेसंबंधातील ताण किंवा चारित्र्यावर संशय

  8. दैनंदिन जीवनातील अपयश किंवा निराशा

  9. जुगार किंवा मटक्याचे आकर्षण – झटपट पैसा कमावण्याची इच्छा

  10. संभाव्य मानसिक आजार किंवा व्यक्तिमत्त्व विकृती

Get A Free Consultation